सरकारी अल्पबचत योजनांच्या व्याजातील कपात मागे; केंद्र सरकारचा दिलासा

Maharashtra Today

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government ) १ एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी या निर्णयात बदल केल्याचे जाहीर केले. परंतु अनेक स्तरातून केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर या निर्णयावर केंद्र सरकारने यू टर्न घेत हा निर्णय परत घेण्याची घोषणा केली आहे. याबद्दलची माहीती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, २०२०-२१च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते, ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे.” असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले.

काय होता निर्णय?

अर्थ मंत्रालयाकडून ३१ मार्च रोजी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते. १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने धक्का दिला आहे. व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात केली होती. PPFचा व्याजदर ७.१ टक्के होता. परंतु केंद्राच्या निर्णयामुळे तो ६.४ टक्क्यांवर आला. मात्र, आता पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याजदर मिळणार आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (NSC) व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात केली होती. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळत होते. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.

सुकन्या समृद्धी योजनेतही कपात

मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्नासाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरातही कपात केली होती. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ७.६ टक्के व्याज मिळायचे. परंतु, हे व्याजदर ६.९ टक्के होणार होते. मात्र, या योजनेत सुद्धा बदल होणार नाही. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेलाही ७.४ टक्के व्याजदर मिळणार आहे. मासिक उत्पन्न खात्यावर ६.६ टक्के व्याजदर कायम राहील. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) ६.८ टक्के व्याजदरही जैसे थे आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button