फटका मार्केटच्या बांधणीस सुरुवात

दोन वर्षांच्या घटने नंतर व्यापाऱ्यांनी घेतला धडा दोन दुकानात दहा फुटांचे अंतर

RTO

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या समोर आयोध्या नगरीच्या मैदानावर यावेळी फटका मार्केट भरणार आहे. त्याच्या बांधणीचे काम सुरु आहे. गेल्या आठवड्यांपासून हे मार्केट तयार करण्याचे काम सुरु आहे. पुढील दोन दिवसात मार्केट तयार होवून फटका विक्रीची सुरुवात होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितली.

दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील दो फटाक संघटनाच्या वतीने फटका बाजारपेठ उभारल्या जात आहे. उत्सव व्यापारी संघटना आणि जय महाराष्ट्र संघटना अशी या दोन संघटनेची नावे आहेत. अनुक्रमे विनोद खांबकर आणि गोपाळ कुलकर्णी या संघटनेचे अध्यक्ष असल्याची माहीती व्यापाऱ्यांनी दिली. दोन्ही संघटनेकडून सुमारे ८० दुकाने या ठिकाणी उभारल्यात जात आहेत. दोन वर्षांर्पूर्वी औरंगपूरा येथील जिल्हा परिषद मैदानावर होते. त्या ठिकाणी अचानक आग लागल्यामुळे सगळी दुकाने जळून खाक झाले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. दुचाकी आणि चार चाकी वाहने जागच्या जागेवर जळून खाक झाल्या होत्या. त्या घटनेनंतर दोन वर्षांपासून हे मार्केट शहराच्या बाहेर आयोध्या नगरी मैदानावर भरवण्यात येते आहे. सुरक्षेची देखील काळजी घेतल्या जाते आहे. दोन दुकानांच्या मध्ये दहा फुटाचे अंतर ठेवण्यात आले आहे. या शिवाय इतर सुरक्षेची देखील काळजी घेण्यात येणार असल्याची माहीती व्यापारी पाडूरंग काथार, राजेश पाटील यांनी दिली.