काँग्रेसमध्ये इनकमिंगला सुरुवात ; नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोमनाथ काशिद यांचा समर्थकांसह प्रवेश

Maharashtra Today

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसमध्येही इनकमिंगला सुरुवात झाली आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पार्लर सलून असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद(Somnath Kashid) यांनी त्यांच्या काही समर्थकांसह काँग्रेस(Congress) पक्षात प्रवेश केला आहे.

आज मी माझा राजकीय प्रवास काँग्रेस पक्षात प्रवेश करून सुरू केला. जमिनीवर राहून कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मोठा न्याय दिला आहे. यापुढे ही राज्यभरातील नाभिक समाज व बारा- बलुतेदार तसेच ओबीसीतील वंचित शोषित मागासलेल्या समाज घटकांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत राहणार,अशी प्रतिक्रिया सोमनाथ काशीद यांनी व्यक्त केली.

पक्षप्रवेश कार्यक्रमात यावेळी काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री के.सी.पाडवी,माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,नाभिक समाजाचे जेष्ठ नेते सरचिटणीस प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button