स्वछता मोहिमेत भिकाऱ्याला गाडीत कोंबून नेले !

Indore beggar was taken during the cleaning operation

इंदूर :- मध्य प्रदेशमधील इंदूर (Indore) हे देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे. स्वछता कायम राखण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एका वृद्ध भिकाऱ्याला मनपाच्या ट्रकमध्ये टाकून नेले! याचा व्हीडीओ काँग्रेसच्या (Congress) नेता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पोस्ट केला आहे. यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

याबाबतचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. इंदूर महापालिकेची एक गाडी घरदार नसलेल्या वृद्धांना शहराबाहेर सोडायला आली होती. एका भिकाऱ्याला मनपाचे कर्मचारी उचलून गाडीत कोंबत असल्याचे दिसते. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan) यांच्या आदेशावरून तीन व्यक्तींना निलंबित करण्यात आले आहे.

नगरपालिकेच्या ट्रकमधून निराधार आणि वृद्ध व्यक्तींना शहराबाहेर देवास हायवेवर सोडण्यात येणार होते, असे कळते. हायवेवर तिथल्या लोकांनी याला विरोध केला म्हणून त्यांना पुन्हा त्यांच्या  मूळ ठिकाणी परत नेऊन सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER