गर्भधारणेपूर्वी – शरीर व मनाची तयारी आवश्यक !

Pregnancy

स्वस्थ बाळ होणे व गर्भावस्थेत त्रास न होणे ही प्रत्येक आईवडीलांची अपेक्षा असते. केवळ गर्भावस्थेत (Pregnancy) पौष्टीक आहार घेणे महत्त्वाचे नसून गर्भधारणेपूर्वी आईवडीलांची शारीरिक मानसिक तयारी असणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. आयुर्वेद (Ayurveda) शास्त्रात स्त्री बीज पुरुष बीज शुद्धी जेवढी महत्त्वाची सांगितली आहे. तेवढेच शांत मनाने नवीन आत्म्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे.

ॐ अहिरसि आयुरसि सर्वतः प्रतिष्ठासि ।
धाता त्वां दधातु विधाता त्वां दधातु ब्रह्मवर्चसा भवेति ।

इतकी सुंदर भावना मनात उत्पन्न होणे मातृत्वाला सामोरे जाणे हे महत्त्वाचे आहे. मैथुन करणे त्यानंतर गर्भधारणा होणे हे नैसर्गिक आहे. परंतु नवीन जीव आपल्या गर्भाशयात कुशीत येणार तो सर्वार्थाने योग्य असावा ही भावना महत्त्वाची. मातृज पितृज आत्म्यज सात्म्यज रसज सत्त्वज हे षडभाव चांगले असावे याकरीता गर्भधारणेचा काळ विचारात घेतला आहे.

अनेक चुकीच्या आहार विहाराच्या सवयी, क्रोध ईर्ष्या मानसिक अशांतता, पतीपत्नीचा असंवाद, मैथुनाच्या वेळी प्रेमभावना नसणे, मैथुनाच्या चुकीच्या सवयी अथवा अज्ञान या सर्व गोष्टी गर्भधारणेपूर्वी विचारात घेऊन योग्य सल्ला चिकित्सा आवश्यक ठरतात. पंचकर्म चिकित्सा, मार्गदर्शन, योग्य आहारविहार, व्यायाम या सर्वांची सांगड घालून पती पत्नीला गर्भधारणेकरीता तयार करणे हे महत्वाचे ठरते. गर्भधारणेकरीता आता आययूआय, आय व्ही एफ, सरोगसी सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वच उपाय खर्चिक, मानसिक शारीरिक त्रास देणारे आहेत. परंतु गर्भधारणेपूर्वी थोडा विचार वा तज्ज्ञांकडून जाणून घेतल्यास स्वस्थ बाळ नक्कीच होऊ शकेल. प्रेगन्सी आनंददायक असावी याकरीता गर्भधारणेपूर्वीची आजच्या काळात खूपच महत्वाची !

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER