महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप, नेत्यांमध्ये जुंपली

Aurangabad Muncipal Election- BJP-Shivsena

औरंगाबाद: भाजप सोडून शिवसेनेत दाखल झालेले किशनचंद तनवाणी यांच्याविरोधात भागवत कराड यांनी केलेल्या टीकेमुळे औरंगाबाद महापालिकेमध्ये 30 वर्षे युतीत सत्तेत असलेल्या सेना-भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच जुंपली आहे. त्यावरून किशनचंद तनवाणी यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या घरावर दगडफेक करत शासकीय गाडीची तोडफोड केली होती.

कराड यांनी तनवाणी यांना ‘सत्तेच्या गुळाला चिकटलेला मुंगळा’ असे म्हटले होते. यामुळे तनवाणी समर्थक संतापले आणि भागवत कराड यांच्या घरावर हल्ला केला. हल्ल्यात तनवाणी यांचा हात असल्याचा आरोप कराड यांनी केला आहे. आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपला सोडून सेनेत प्रवेश केला आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांनी तनवाणींवर टीका केली केली होती.

बैठक! शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, अजित पवारही हजर

भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर तनवाणी समर्थकांवर कारवाई करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, किशनचंद तनवाणी यांनी हल्ला करणारे भाजप पदाधिकारी असल्याचा पलटवार केला आहे.

औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांच्या घरामध्ये उभ्या कारची अज्ञातांनी तोडफोड केली. घरावर अज्ञात हल्लेखोरांनी तुफान दगडफेक केली. परंतु, हा हल्ला शिवसेना नेत्याच्या समर्थकांनी केला असल्याचं बोललं जात आहे.