पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाली कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) कायम असून मुंबईत आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (monsoon-session) सुरु होत आहे . अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येक जणांची स्वॅब टेस्ट (Swab test) घेतली गेली आहे.

मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे . तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे .

कोरोनाबाधितांमध्ये सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जण असल्याची माहिती आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आढळल्याची संख्येमध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसेच काही प्रसारमाध्यमातील लोकांचाही समावेश आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER