… तर विमानात बसू नका! इंग्लंडला जाण्यापूर्वी विराट कोहलीने सहकाऱ्यांना बजावले

मुंबई : इंग्लंडच्या विमानात बसण्याआधी विराटने (Virat Kohli) एक पत्रकार परिषद घेतली आणि टीम इंडियाच्या सहकाऱ्यांना बजावले – तुम्हाला वाटत असेल की फायनलमध्ये न्यूझिलंडचे पारडे जड आहे, तर विमानात बसू नका. दोन्ही संघ समसमान आहेत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही एका संघाला बलाढ्य म्हणणे योग्य ठरणार नाही. भारतीय संघ इंग्लंडमध्ये १८ जून रोजी इंग्लंडविरोधात फायनल कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर इंग्लंडविरोधात पाच कसोटींची मालिका होणार आहे.

आम्ही हर प्रकारे न्यूझिलंड एवढेच उत्तम आहोत, या विश्वासाने आम्ही विमानात चढणार आहोत, असे कोहली म्हणाला. कोहली प्रत्येक दौऱ्यावेळी अशीच तयारी करतो. टीमला जिंकण्याच्या मानसिकतेने खेळायला उतरण्यासाठी प्रेरित करतो. समोरचा संघ दबावाखाली आला पाहिजे. त्या संघाने आपला फायदा उठवता नये, असा कोहलीचा प्रयत्न असतो.

भारतीय संघ न्यूझिलंडच्या दौऱ्यावर होता. तेव्हा त्याला पराभव पत्करावा लागला होता. यामुळे न्यूझिलंडचे पारडे जड आहे, असे म्हटले जात आहे. टीम इंडिया कमी प्रॅक्टीस आणि प्रॅक्टीस मॅच न खेळता फायनल मॅचमध्ये उतरणार आहे. टीमला इंग्लंडमध्ये १० दिवस क्वारंटाईनमध्ये काढावे लागणार आहेत. यामुळे संघाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.