आधी शेतकरी आता एस टी कर्मचारी आत्महत्या, सर्वांनी जगावे तरी कसे? – मनसे

CM Uddhav Thackeray - Bala Nandgaonkar

मुंबई : सलग तीन महिन्यांचा पगार थकल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी (ST Employees) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही (MNS) राज्य सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे.

१० सप्टेंबरला एस टी कर्मचारी थकीत पगाराबाबत ट्विट केले होते, काही दिवसांनी सरकारने ते पगार केले, परंतु आता परत तोच विषय? सरकार ला या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे, आधी शेतकरी आत्महत्या करायचे आता एस टी कर्मचारी आत्महत्या ची बातमी बघून तरी सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. कोणतेही नवीन सरकार आले की मंत्र्यांना गाड्या व त्यांचे निवासस्थान यासाठी कोट्यावधी रुपये सरकार कडे असतात, परंतु अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या सर्वांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER