दादासाहेब फाळकें आधी सिनेमा बनवणारे कोण होते ‘हिरालाल सेन’?

Maharashtra Today

भारतीय सिनेमाचा (Cinema)उल्लेख झाला एक नाव आठवल्याशिवाय राहत नाही धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके(Dadasaheb Phalke). त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचं जनक मानलं जातं. पण खुप कमी लोकांना माहिती असेल की दादासाहेब फाळके यांच्याआधी सुद्धा भारतात सिनेमा बनवण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याआधी भारतात सिनेमे बनले होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धाची ही गोष्ट जेव्हा भारतीय नाटकांसाठी बनलेल्यावास्तूंमध्ये थिएटरसाठी बदल होणार होते.

कलकत्ता त्यावेळी भारताच्या सांस्कृतीक जडणघडणीचं केंद्र बनलं होतं. त्याच दिवसांमध्ये भारतीय सिनेमांमध्ये एक प्रयोगितत्त्वार चित्रपट बनवण्यात आला. ज्याचे दिग्दर्शक होते, ‘हिरालाल सेन’ त्यांच्या आयुष्यात बऱ्याच मोठ्या संघर्षाला तोंड देत त्यांनी सिनेमा बनवला.

कलकत्त्यात स्टार थिएटरचा पाया रचला

१९ व्या शतकात इंग्रजांनी भारत काबिज करण्याची मोहिम हातात घेतली. त्या विरोधा मोठा विद्रोह जाला. १८५७ च्या उठावाच्या सैनिकी उठावाचा अंत करुन इंग्रजांनी भारता गिळायला सुरुवात केली त्यावेळी कलकत्ता त्यांची राजधानी होती. कलकत्त्यात इंग्रज स्थिरावले आणि तिथंच इंग्रजांना भारतातून हुसकावण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात झाली. ही क्रांती थिएटरमधून सुरु होती.

बिगर बंगाली आणि बंगाल्यांची संमिश्र लोकवस्ती असलेल्या कलकत्त्यात २५ मे १८८८ मध्ये स्टार थिएटरचा उभारण्यात आलं. यात कलकत्तातली तमाम नाटकं सादर केली जात होती. रामकृष्ण परमहंसपासून ते रविंद्रनाथ टागोर इत्यादी महान माणसं कलत्त्यातल्या थिएटरमध्ये प्रेक्षक म्हणून यायची.

फोटोग्राफर ते फिल्ममेकर

१९ व्या शतकाचं हे सहावं दशक. तेव्हा पश्चिम बंगाल अस्तित्त्त्वा नव्हतं. बंगाल, बिहार, ओडीसासह बांग्लादेशाला बंगाल नावानं ओळखलं जायचं. याच बंगालमधील ‘मानिकगंज’ मध्ये एक गाव होतं बागजुरी आता ते बांग्लादेशमध्ये आहे. बागजुरीचे जमिनदार होते चंद्रमोहन सेन. व्यवसायानं वकील होते. त्यांच्या घरी १८६६ साली ‘हिरालाल सेन’ (Hiralal Sen)यांनी जन्म घेतला. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना फोटो ग्राफीत जास्त रस होता. प्राथमिक शिक्षण गावात पुर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी कलकत्ता गाठलं. तिथून त्यांच्या मनात फोटोग्राफी विषयी कुतुहल निर्माण झालं.

१८८७ मध्ये त्यांनी फोटग्राफी संबंधी स्पर्धेत भाग घेतला आणि पुरस्कारही मिळाला. यानंतर त्यांनी अनेक पुरस्कार स्वतःच्या नावे केले. १८९० मध्ये त्यांनी कलकत्त्यात आणि मानिकगंजमध्ये स्वतःचा स्टुडीओ उभारला. इकडं हरिलाल फोटोग्राफीत गुंग होते तर जगाच्या दुसऱ्या टोकात सिनेमा गर्भातून निघून जागितक स्तरावरी प्रयोगातून जात होता. सिनेमासाठी हा संक्रमणाचा काळ होता.

‘द अराहयव्हल ऑफ अ ट्रेन’ बनलं कुतुहालाचा विषय

ल्युमियर बंधूंनी चित्रपटाविषयी प्रयोग करायला सुरु केले. त्यांची ५० सेकेंदांची फिल्म ‘द अरायव्हल ऑफ अ ट्रेन’ पॅरिस आणि मुंबईत प्रदर्शित झाली आणि सिनेमासंबंधीत लोकांमध्ये कुतुहल निर्माण झालं. याच्या काहीदिवसांनंतर १८९८ मध्ये प्रोफेसर ‘स्टीवेंसन’ एका नाटकासाठी कलकत्त्याला आले. नाटकासाठी त्यांनी स्टार थिएटर निवडलं. खचाखच भरलेल्या या हॉलमध्ये त्यांनी ‘फ्लावर ऑफ पर्शिया’चे सादरीकरण झाले. यावेळी हिरालाल सेनसुद्धा प्रेक्षकांमध्ये बसले होते.

ही एक लहान फिल्म होती परंतू अनेकांना याने प्रभावित केलं पैकी एक होते हिरालाल सेन. त्यांच्या मनात सिनेमा बनवायची इच्छा पैदा झाली. मनातली इच्छा त्यांनी स्टीवेंसन यांना बोलून दाखवली, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी स्वतःचा कॅमेरा त्यांना दिला. हिरालाल यांनी त्याच कॅमेरातून ‘फ्लावर ऑफ पर्शिया’ सिनेमातील एक डान्स सिक्वेंस शुट केला.

त्यांनी सिनेमाविषयक चांगला अभ्यास केला. उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरुन सिनेमा बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी गरजेचा होता कॅमेरा. हिरालाल आणि त्यांचे बंधू मोतीलाल यांनी त्यावेळी ५ हजार रुपयांचा जुगाड करत लंडनमधून बायस्कोप सिनेमॅटोग्राफीक मशिक खरेदी केली. त्याचवर्षी ४ एप्रिलला मशिनच्या माध्यमातून बनवलेला सिनेमा प्रदर्शित कऱण्यात आली. यानंतर त्यांनी ‘रॉयल बायस्कोप’ कंपनीची स्थापना केली. कलकत्त्याच्या चित्तपुरमध्ये कंपनीचं कार्यालय सुरु झालं. दादासाहेब फाळकेंच्या उदयापुर्वी हिरलाल यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी उभी केली होती.

शेवटचे दिवस

हिरालाल यांनी मोठ्या कल्पकतेने अडचणींवर मात केली. चुना रंगवून त्याद्वारे प्रकाश निर्मिती केली त्यावेळी न वीज उपलब्ध होती न प्रकाशझोत अशावेळी त्यांनी कॅमेऱ्यातून चित्रीकरण केलं. १९०३ मध्ये त्यांनी पहिली फिल्म ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ प्रदर्शित केली. हा सिनेमा बनून प्रदर्शित झाल्यानंतर १० वर्षांनी दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिशचंद्र’ हा पहिला सिनेमा बनवला होता.

१९१३ पर्यंत त्यांनी ४० सिनेमे बनवले होते. हा तो काळ होता जेव्हा सिनेमात नवीन नवीन तंत्रज्ञान उदयाला येत होतं जुनं तंत्रज्ञान स्पर्धेतून बाहेर फेकलं जात होतं. या वर्षी दादासाहेब फाळके सिनेमा बनवण्यासाठी संघर्ष करत होते तर हिरालाल सेने जुनी उपकरणं विकत होते. १९१७ पर्यंत असंच चित्र होतं परंतू या वर्षी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

चित्तपुरमधल्या हिरालाल यांच्या रॉयल बायस्कोप कंपनीला आग लागली आणि या आगीत त्यांनी बनवलेले सर्व सिनेमे जळून खाक झाले. अलिबाबा और चालिस चोर हा एकमेव सिनेमा होता जो हिरालाल यांना भारतीय चित्रपट सृष्टीच्या जनकाचा दर्जा देणार होता परंतू या आगीत त्या सिनेमाची रीळ ही भस्मसात झाली. आयुष्यभर सिनेमाच वेड घेऊन जगणाऱ्या हिरालाल यांना हा धक्का सहन झाला नाही. यातच काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button