आधी अजित पवार, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही घेतली भेट, शरद पवारही साता-यातच राजेंच्या मनात काय?

Uddhav Thackeray - Shivendra Raje Bhosale

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे दिग्गजांकडून वारंवार होणा-या मेगाभरतीच्या विधानाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे तर, अनेकांच्या मनात लाडूही फुटत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातच आज साताऱ्यात भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, बुधवारीच शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती.

शिवंद्रराजेंची भेटीगाठी आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपमधील (BJP) काही नेते संपर्कात असल्याचे सांगितल्यामुळे साता-यात मेगाभरतीची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारदेखील आज साता-यात आहेत.

आज भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी साताऱ्याच्या विविध विकासकामाबाबत पाठपुरवा केला आहे. बुधवारी शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मेडिकल कॉलेजसाठी निधीची मागणी केली होती.

आमदार शिवेंद्रराजेंच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्र्यांनी आणखी 61 कोटींची तरतूद केली. जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यश आले आहे.

नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली होती. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 61 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) थेट आज साताऱ्यात दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER