धनंजय मुंडेंचा पराक्रम : बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा

Pritam Munde

बीड : विधानसभेनंतर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पराक्रमाने बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचं सरकार २ महिनेही टिकेल याची खात्री नाही

बीडमध्ये ५८ पैकी ३२ मतं महाविकास आघाडीला तर २१ मतं भाजपला मिळाली. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच भाजपने पराभव स्वीकारला होता. ‘लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्विट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आधीच मैदान सोडलं होतं.

तसेच, आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्याची कबुली खुद्द भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी दिली आहे. परळी विधानसभेपाठोपाठ बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला.