बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर काका-पुतण्या आमने-सामने

Bharatbhushan Kshirsagar-

मुंबई : राज्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे . बीड (Beed) शहरातील पिंपळगव्हाण सिमेंट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे .

शिवसेनेचे (Shivsena) नगराध्यक्ष डॉ .भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushan Kshirsagar) यांच्याकडून हे काम केले जात असताना आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ‘काकू नाना विकास आघाडी’च्या नगरसेवकांनी या रस्त्याचे काम अडवून गुत्तेदाराला दमदाटी करत काम बंद पाडले असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरअध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केली आहे. तर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे राष्ट्रवादीच्या (काकू नाना विकास आघाडीच्या) नगरसेवका कडून सांगण्यात येत आहे. यावरूनच आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आमदार संदीप क्षीरसागर (Sandip-kshirsagar) आणि नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर काका-पुतणे आमने सामने आले. यामुळे बीड शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बीड नगरपालिकेच्या (Beed Nagarpalika) निवडणुकीमधूनच काका-पुतण्याच्या संघर्षाची पहिल्यांदा ठिणगी पडली होती. यामध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडीची स्थापना करत काका नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात पॅनल उभा केला होता. यामध्ये लोकमतातून नगराध्यक्ष निवडीमुळे काका डॉ भारतभूषन क्षीरसागर हे नगराध्यक्ष झाले, तर यात संख्याबळाच्या तुलनेत नगरसेवक जास्त निवडून आल्याने पुतण्या संदीप क्षीरसागर यांचे लहान बंधू हेमंत क्षीरसागर हे उपनगराध्यक्ष झाले.

तेव्हापासून आजपर्यंत नगरपालिकेच्या विकास कामावरून सतत दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू आहे. पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या आमने-सामने आल्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत केले. तेव्हापासून राजकीय मैदानातील वाद शमला होता. मात्र पुन्हा एकदा नगरपालिकेमधील विकासकामांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER