बीड लोकसभा ; प्रितम मुंडेचा उमेदवारी अर्ज दाखल

Pritam Munde

बीड :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ.प्रितम मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी बीडकडे रवाना झाल्या. परळीहून निघण्यापूर्वी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनी कुटुंबियांसह प्रभू वैद्यनाथाचे तसेच गोपीनाथ गडाचे दर्शन घेतले.

ही बातमी पण वाचा : बीड लोकसभा : बीडचे राजकारण पुन्हा एकदा मुंडेंभोवतीच

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे आज दुपारी २ वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी यशःश्री निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. प्रितम यांच्यासोबत त्यांंच्या आई, दोन्ही बहिणी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असणार आहे. दरम्यान, प्रितम यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे सुद्धा आजच अर्ज भरणार आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजपच्या दबावामुळे धनंजय मुंडेंची सभा रद्द, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप!

ही बातमी पण वाचा : सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचं जोरदार शक्तीप्रदर्शन ; उमेदवारी अर्ज दाखल