पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शेतकरी सरसावले ; पाच क्विंटल मोसंबीचे वाटप

मुंबई : करोना आणि लॉकडाऊन यामुळे भारतात विविध प्रकारची संकटे उभी राहिली आहेत. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यातदेखील झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. यानंतर सर्व जण आपापल्या परीने मदत करत आहेत.याच पार्श्वभूमीवर

बीड जिल्ह्यातील वांगी गावच्या सखाराम शिंदेया शेतकऱ्याने देखील कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शेतातील पाच क्विंटल मोसंबीचं मोफत वाटप केलं आहे. या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यासाठी एका शेतकऱ्याने शेतातील पाच क्विंटल मोसंबी मोफत वाटली. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना या सैनिकांना ‘सी’ जीवनसत्व मिळावं म्हणून हे पाऊल उचललं आहे.

बीड जिल्ह्यातील वांगी शिवनी गावच्या सखाराम शिंदे या शेतकऱ्याने या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मोसंबीच्या बागेतील पाच क्विंटल मोसंबी बीड शहरातील 24 तास सेवेत असणाऱ्या दोनशे ते अडीचशे कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे.