धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली, पंकजा मुंडेंचा घणाघात

Maharashtrta Today

बीड :- बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कामाने बीड जिल्ह्याची नेहमीच मान खाली गेली आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. बीडचे अनेक अधिकारी अँटी करप्शच्या जाळ्यात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला.

जिल्ह्यात जेव्हा पाच वर्षे आमची सत्ता होती तेव्हा जिल्ह्यामध्ये एक आदर्श काम आणि कामाची ओळख निर्माण झाली होती. आता सध्या या पालकमंत्र्यांच्या सत्तेत अनेक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकत आहेत आणि त्यामुळे बीड जिल्ह्याला मान खाली घालावी लागत आहे. पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक दबाव नाही किंबहुना दबाव नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या मनमर्जीने काम करत आहे. आमची सत्ता असताना सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना धाकात ठेवायचो पण आता तसं होताना दिसत नाही, असं पंकडा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये भ्रष्टाचारी अधिकारी आणले. त्यांना वेळोवेळी अभय दिले. त्याचमुळे अनेक अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकत आहेत. हे बाब बीडसाठी चांगली नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : राठोडांच्या राजीनाम्यानंतर ‘धनंजय मुंडें वाचले’ अशा का होत आहेत चर्चा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER