बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे निधन

बीड : बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे (Jail Superintendent Sanjay Kamble ) यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. अधिक्षक संजय कांबळे मुंबई असतांना मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कसाबची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या नियंत्रणात होती. ही मोठी जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या पेलावली होती.

मुंबईनंतर मागील काही महिन्यापासून ते बीड येथे जिल्हा कारागृहाचे अधिक्षक म्हणून काम पाहत होते. काही दिवसांपुर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी ते उपचार करून घरी परतले असता बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER