बीड जिल्हा बँक निवडणुकीत पंकजा मुंडेंना धक्का; महाविकास आघाडीला यश

Pankaja Munde-Dhananjay Munde

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (beed-district-central-co-operative-bank-election) भाजप नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) जबरदस्त धक्का बसला आहे. बीडमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या अमोल आंधळे यांचा विजय झाला आहे. तर भाजपच्या धनराज राजाभाऊ मुंडे यांना पराभव स्वीकारावे लागले .

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमुळे राजकारण तापले होते. ही निवडणूक 20 मार्चला पार पडली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या आमोल आंधळे यांचा 223 मतांनी विजय झाला आहे. तसेच भाऊसाहेब नाटकर यांना 42 तर अपक्ष उमेदवार पापा मोदी यांना 92 मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या धनराज राजाभाऊ मुंडे यांना केवळ 9 मतं मिळाली आहे. तसेच बदामराव पंडित यांना 2 मते मिळाली आहेत.

त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालामुळे पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांना मात्र या निवडणुकीत यश मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER