बीड जिल्हा बँक : परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; पंकजा मुंडे घटनास्थळी

pankaja munde - Maharastra Today

बीड :- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान परळी मतदान केंद्रावर राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रावरच भिडले. त्यानंतर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मतदान केंद्रावर पोहचल्या. बँकेवर प्रशासन बसवण्याचं सत्ताधारी पक्षाचं कारस्थान आहे, म्हणून आम्ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.

दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. चार वाजल्यानंतरही मतदान सुरू असल्याने तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कोणतेही कारण नसताना आमचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्यात आले. सरकारकडून हा आमच्यावर अन्याय आहे. कोरम पूर्ण होण्यासाठी ही उमेदवार संख्या ठीक नाही.  त्यामुळे नैसर्गिक प्रशासक येणे हे ठीक आहे. मात्र बँकेवर प्रशासन बसवण्याचे कारस्थान सत्ताधारी पक्षाचे आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडेंचा निर्णय, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER