बीड,परळीतून मुंडे भगिनींना कुणाचा बापही हरवू शकत नाही!

Pritam Munde-Pankaja munde

पुणे :- बीड आणि परळी येथून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघी बहिणी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार, कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, अशी टीका राज्यमंत्री महादेव जानकर यांनी धनंजय मुंडेच्या नावाचा उल्लेख टाळत केली. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी जानकर म्हणाले की, जो कोणी व्हाट्स ऍपवर म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला आवाहन देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे या दोघ्या बहिणी मोठ्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचं कारणच नाही. तसंच, मुंडे यांच्यामुळे राजकीय क्षेत्रातील उंची वाढली. सर्वकाही रेडीमेड मिळाले असं देखील ते म्हणाले. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे. असं म्हणत बारामतीमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जानकर यांनी यावेळी बोलून दाखवली. यावेळी राज्यमंत्री पंकजा मुंडे,आजी माजी आमदार,कार्यकर्ते उपस्थित होते.