शय्यामूत्रता – कारणे व उपाययोजना !

BED Weeting

लहान मुलं बरेच वेळा अंथरूणात लघवी करतात. त्यांच्या लक्षातही येत नाही किंवा झोप इतकी गाढ असते की कळतच नाही असे पालक सांगतात. बरेचवेळा सुरवातीला याकडे दुर्लक्ष केले जाते. मुलं शाळेत जायला लागली आणि तरीही अंथरुणात लघवी करणे चालूच राहिले तर पालक सजग होतात. शय्या मूत्रता या आजाराची कारणे शोधणे आवश्यक ठरते. यात मुख्यतः शारीरिक व मानसिक अशी कारणे दिसून येतात.

१) कृमी – या वयात कृमी / जंत असणे हे मुख्यतः दिसून येते. त्यामुळे अपचन, गुदकंडू, लघवीच्या जागी खाज, मल मूत्र नियंत्रण नसणे ही लक्षणे असतात.
२) मधुमेह
३) स्नायु शिथिल असणे
४) अशक्तपणा
५) तेलाची मालीश न करणे.

मानसिक कारणांमधे मुख्यतः भिती वाटणे. मोठ्यांनी सतत रागविणे, मनात कसला न्यूनगंड निर्माण होणे, सतत मोबाईल टिव्ही बघिल्याने मनावर व मेंदूवर परीणाम, अभ्यासाचा ताण अशी अनेक कारणे असू शकतात.

 • यावर मुख्य चिकित्सा वा उपाय योजना म्हणजे प्रेमाने समजविणे.
 • कृमिंची चिकित्सा महत्त्वपूर्ण आहे. त्याकरीता वैद्याचा सल्ला नक्की घ्यावा.
 • पोट साफ राहणे आवश्यक आहे. त्याकरीता एरंड तेल, हरीतकी चूर्ण गरम पाण्यासह देणे फायदेशीर ठरते.
 • जेवणात ओवा सुंठ हिंग जीरे यांचा समावेश पाचन चांगले करणारे आहे.
 • महानारायण तेलाने मालीश स्नायु मांसपेशींना बल देणारे आहे. नियमित अभ्यंग शरीराला उपयोगीच आहे.
 • रात्रीचे जेवण 7 पर्यंत करणे. त्यात पातळ पदार्थ जास्त नसावे.
 • ज्यूस फळं रात्री देऊ नये. उगीच पाणी पिऊ नये.
 • जेवण करतांना रागविणे, अप्रिय गोष्टी बोलणे किंवा टिव्ही बघणे टाळावे.
 • झोपण्यापूर्वी लघवी करणे. टिव्ही बघत न झोपणे हे नियम पाळावे.
 • स्व सूचना देणे खूप मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणात सू होणार नाही, जाग येणार, बाथरूममधेच सू करणार अशा स्वसूचना फायदा करतात.
 • शय्या मूत्रता हा आजार नक्कीच बरा होतो फक्त शांतपणे, मैत्रीपूर्वक संवाद महत्त्वाचा ठरतो. औषधाकरीता तज्ज्ञ वैद्याचा सल्ला नक्की घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER