बेकर व किरयोसमध्ये जुंपली, एकमेकांना म्हणाले तू उंदीर! तू डोनट!!

जर्मन टेनिसपटू अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव याच्यावर सोशल डिस्टन्सिंग व सेल्फ आयसोलेशन न पाळल्याबद्दल टीका करणारा ऑस्ट्रेलियन स्पष्टवक्ता टेनिसपटू आणि जर्मनीचा ग्रेट टेनिसपटू बोरिस बेकर यांच्यावर टिष्ट्ववरवर शाब्दिक युद्ध जुंपले आहे. त्यात बेकर यांनी किरयोसला ‘रॅट’ (उंदीर) संबोधले आहे तर किरयोसने प्रत्युत्तराय बेकर यांना ‘डोनट’ म्हटले आहे.

नंबर वन जोकोवीच आयोजित आणि कोरोना बाधित सिद्ध झालेल्या एड्रिया टेनिस टूरमध्ये सहभागी झाल्यानंतर झ्वेरेव आश्वासन दिल्याप्रमाणे सेल्फ आयसोलेशन मध्ये न जाता एका हॉलमध्ये गर्दीत पार्टीत सहभागी झाला आणि त्यात मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंग न पाळता नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरुन हे रामायण घडले आहे. त्यानंतर नीक किरयोसने अ‍ॅलेक्वांझर झ्वेरेवच्या बेफिकिर वर्तनाचा समाचार घेताना ‘किती मतलबी होणार’ असे टिष्ट्वट केले होते.

त्याच्या या टीकेला बेकर यांनी आक्षेप घेतला आहे. बेकर यांनी अतिशय तिखट शब्दात किरयोसला उत्तर देताना व्टिट केले की, मला उंदीर आवडत नाहीत. सहकारी खेळाडूंना शहाणपण शिकविणारा माझा मित्र होऊ शकत नाही. अशा लोकांनी स्वत:कडे एकदा आरशात बघावे आणि ते आमच्यापेक्षा चांगले आहेत का, याचा स्वत:च विचार करावा.

याच्या उत्तरात किरयोसने टिष्ट्वट केले, ‘मी कुणाशीही स्पर्धा करत नाहीये की कुणाबद्दलही वाईट चिंतीत नाहीये, बोरीस, मी हे भल्यासाठीच म्हणतोय. ही जागतिक महामारी आहे आणि अ‍ॅलेक्स ने जे केले तसा मुर्खपणा कुणी करत असेल तर मी त्याला बोलणारच ना…एवढे हे साधेसोपे आहे.

यालाही बेकर यांनी उत्तर दिले आणि त्यांनी टिष्ट्वट केले, ‘आपण सर्वच कोवीड-१९ सारख्या महामारीसोबत जगतोय. त्याने कित्येकांना जीव गमवावा लागला आहे आणि हे भयंकर आहे. नियमांचे पालन करून आपले कुटुंब व प्रिय व्यक्तींची काळजी आपण घ्यायलाच हवी पण तरीसुद्धा मला ‘उंदीर’ आवडत नाहीत.

यावर गप्प बसेल तो किरयोस कसला, त्यानेही व्टिट केले, ‘उंदीर? का..तर कुणाला जबाबदार धरले म्हणून? हा विचित्रच विचार आहे चॅम्पियन! मी फक्त लोकांकडे बघत होतो. माझे कुटुंब आणि जगभरातील असंख्य कुटुंब योग्य प्रकारे नियमांचे पालन करुन सन्मानाने जगत असताना कुणी मुर्खासारखे वागत असेल तर आम्ही काहीच बोलायचे नाही का? बोरिस बेकर हा मला वाटत होते त्यापेक्षा मोठा डोनट निघाला, जो फक्त व्हॉलीच करू शकतो.

यानंतर बेकर यांनी अधिकच वैयक्तिक टीका करत व्टिट केले की, नीक किरयोस आपल्या क्षमतांना खरा उतरून ग्रँड स्लॅम जिंकू शकतो की नाही हेच मला आता पहायचे आहे. तो जगभरातील युवकांसाठी समानता, वंशवाद आणि संवर्धनासाठी एक चांगला आदर्श ठरेल. म्हणून बडी! तयार हो आणि करून दाखव!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER