तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जावं लागेल, कळत नाही का? मनसेचा खोचक टीका

CM Uddhav Thackeray - Vijay Wadettiwar - Sandeep Deshpande

मुंबई : आज आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील 18 जिल्ह्यात अनलॉक (Unlock) करण्यात येईल अशी घोषणा केली. वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानुसार नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी आता ठाकरे सरकारची (Thackeray Government) खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे.

या सर्व घडामोडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केले आहे. मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली. ‘वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत. काही कळत की नाही तुम्हाला’, अश्या शब्दात देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर मिस्कील टीका केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button