…कारण मी आहे पक्का संघवाला- विनोद तावडे

Vinod Tawde

मुंबई : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मला तिकीट मिळाले नाही. मनसेप्रमुख राज ठाकरेंसह  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फोन करून माझी विचारपूस केली होती. परंतु, तिकीट न मिळाल्यामुळे भाजपा (BJP) सोड आणि आमच्याकडे ये, असे म्हणायची हिंमत यापैकी कुणीही केली नाही. कारण, मी पक्का संघवाला आहे. विद्यार्थी परिषदेचा आहे, हे त्यांना माहीत आहे, असे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सांगितले.

विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. विनोद तावडे म्हणाले की, पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बरे वाटते आणि काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिले नाही, तर वाईट का वाटावे ? परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तावडे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, राजकारणात चढउतार येतच असतात. कुणीही एकाच ठिकाणी राहात नाही.

हा साप-शिडीचा खेळ आहे. विनोद तावडे यांच्याकडून संयम ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. त्यामध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचिटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER