राज्याचे नवे गृहमंत्री ठरले; पवारांनी सर्वात जास्त विश्वासू असलेल्या शिलेदारालाच निवडले

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून थेट सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर जाणार याबाबत तर्कवितर्क सुरु होते. त्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना दिले आहे. तसेच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे शरद पवारांनी (Sharad Pawar) सर्वात जास्त विश्वासू असलेल्या शिलेदारालाच निवडले असल्याची चर्चा रंगली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button