मालिकेचा अविभाज्य भाग झाले – अपूर्वा 

Apurva Nemlekar

काही मालिका या प्रेक्षकांना खूप काही देऊन जातात. मालिका करताना त्यातले कलाकार देखील या मालिकेचा हे भाग होऊन जातात. तर काही मालिका या कलाकारांना त्यांची एक वेगळी ओळख देऊन जातात. असचं काही स मराठी मालिका सृष्टीतील एका अभिनेत्री सोबत झालंय. ” रात्रीस खेळ चाले -२ ” या मालिकेतील सगळ्यात गाजलेलं पात्र म्हणजे ” शेवंता ” या शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने उत्तम साकारली आणि हीच शेवंता आता तिची एक वेगळी ओळख झाली आहे. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा या शेवंता अर्थात अपूर्वा हिने एक खास पोस्ट आपल्या सोबत शेयर केली. अपूर्वा ने मालिकेतील खास आठवणी ना उजाळा देऊन ती खूप भावुक झाली आहे.

या खास पोस्ट मध्ये अभिनेत्री अपूर्वा म्हणते   ” नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीसखेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या..

ह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे

पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता

हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही

वाटत आहे.शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते,पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढत च गेले,आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्या बद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे ! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा,ही विनंती एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन ,

बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती

माझा पॅकअप झाल्या नंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटोआणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले. “

काही मालिका या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खरंच कलाकारांची मन जिंकून घेतात. मालिका संपली याचं दुःख सगळ्याच कलाकारांना आहे पण या मालिकेतील सगळीच पात्र ही खूप भन्नाट होती आणि त्यात ही ” शेवंता ” हे पात्र खूप प्रसिद्ध झाल. मालिकेने अपूर्वा ला एक वेगळीच ओळख दिली आहे आणि मालिका संपून देखील हे शेवंता प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER