सुंदरा.. मनामध्ये भरली

Eating Disater

आजही स्त्रियांच्या सौंदर्याच्या कल्पना चौकटीत आखीव-रेखीव आहेत. आजच्या मुव्हीज मधल्या नायीका बघितल्या तर हे चांगले लक्षात येतं, अगदी मिस वर्ड वगैरे साठी निवड झालेल्याबाबत ही त्यांची उंची बांधा हेच लक्षात राहतं. स्वप्नाळू वयातील मुली व इतरही फक्त त्यांच्या बारीक पणाकडेच बघतात आणि आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकच स्त्रीला वाटतं. परंतु त्या सौंदर्य स्पर्धेचे इतर क्रायटेरियाकडे बघण्याची गरज मात्र कुणालाच वाटत नाही. व्यक्तिमत्व बुद्धी डौल, नम्रपणा मोहकपणा ,एकनिष्ठता हे कुणी लक्षात घेत नाही. याउलट आजकाल काही मालिकांच्या नायिका खूप जाड दाखवतात आहे .पण यामुळे मेंटॅलिटी बदलायला किती मदत होईल हा प्रश्नच आहे. आणि मुख्य म्हणजे अतिबारीक आणि अति जाड यापेक्षा फिटनेसचे महत्व कुणीच ठसवताना दिसत नाही.

मला मरण येईल, या भीतीने पेक्षा माझं वजन वाढेल अशी भीती आज जगातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात वाढते. त्यावरून इटिंग डिसॉर्डर जगभरात फार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे लक्षात येतं. हा प्रकार जास्त करून स्त्रियांमध्ये असून केवळ 10 ते 15 टक्के पुरुष रुग्ण आढळतात. न्युझीलँड कॅनडा, जपान, जर्मनी ,व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान या सगळ्या देशांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. भारतही याला अपवाद नाही. गेल्या दहा वर्षात आजाराचे प्रमाण पंधरा पट वाढलेले आहे.

मानसशास्त्रातील डीएसएम नुसार इटींग दिसोर्डरचे, अनोरेक्झिया नर्वोसा, ब्युलिमिया नर्वोसा, बिंज eating disorder असे तीन प्रकार आहेत. जी कुटुंब काहीतरी साध्य करण्यावर सतत लक्ष केंद्रित करतात, परिपूर्णता ज्यांना महत्त्वाची वाटते हे खूप महत्त्वाचं वाटतं, दुःख किंवा राग कशा भावना हाताळायचा हे ज्यांना कळत नाही समाजातले आपले स्थान ज्यांना प्रचंडच महत्त्वाचं वाटतं आणि समाजाने आपल्याला मान्य करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज वाटते, आपल्या वजनाबद्दल ज्याना प्रचंड काळजी असते आणि मुलांच्या आयुष्यात जे पालक नको इतकं नाक खूपसत असतात, त्या कुटुंबातल्या मुलांना इटीन दिसोर्डर घडण्याची खूप शक्यता असते.

@ आनोरेक्सीया नर्सोवा हा विकार जगभरातल्या वरच्या वर्गातल्या अनेक लोकांना झालेला आढळतो आणि तो माध्यमांनी झिरो फिगरच अवास्तव स्तोम माजवण्या आधीपासून अस्तित्वात आहे. मात्र 1940 पासून खऱ्या अर्थाने मानसशास्त्रीय विश्लेषण सुरु झालं, आणि 1952 ही पहिली इटिंग दिसोर्डर म्हणून नोंदवली गेली. त्यांना आपल्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण जातं आणि आपल्या कुटुंबाबद्दल किंवा एकूणच जगाबद्दल असलेला राग व्यक्त करू शकत नाहीत .त्यामुळे त्यांच्या भावना मनावर परिणाम करतात आणि स्वतःबद्दल मनामध्ये घृणा निर्माण होते. स्वतःला शिक्षा करून घेण्याची भावना बळावते. याच स्वतःला इजा करून घेणे, आत्महत्या अशा धोकादायक गोष्टीही घडू शकतात. परंतु ज्या लोकांना आपल्याकडे सतत कोणीतरी लक्ष द्यावे, असं वाटतं ज्यांना आयुष्यात जमवून घेणे अवघड वाटतं. एकटेपणा, पोकळी जाणवते. आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशाही लोकांना अनोरेक्सिया जडण्याची शक्यता असते.

आपलं वय आणि उंची याला अनुसरून वजन राखायला नकार देणे .आपल्या वजन प्रमाणापेक्षा कमी असताना सतत आपलं वजन वाढेल याची अति प्रमाणात भीती वाटणं .आपले वजन प्रमाणापेक्षा कमी आहे हे मान्यच न होणे, आणि सुडौल शरीर यष्टीबद्दल भ्रामक कल्पना बाळगणं या व्यक्ती, आणि स्त्रियांमध्ये वजन कमी झाल्यानंतर तीन वेळा सलग पाळी न येणे या लक्षणांवरून अनोरेक्सीया नर्व्होसा या आजाराचं निदान केलं जातं. बरेचदा या व्यक्ती एखाद्या आठवड्यात एक-दोन दिवस प्रचंड प्रमाणात खाणं आणि नंतर एखाद्या आठवड्यात फक्त लिक्विड किंवा फळ खाणं किंवा कधीकधी काही खाद्यपदार्थ अक्षरशः बकाबका खाऊन घेणं आणि नंतर लॅक्झीटी व्ह घेऊन किंवा घशात टूथब्रश खालून उलट्या काढून ते शरीराबाहेर टाकून देणं असेही प्रकार करतात.

टीव्ही, जागतिकीकरणाची लाट, माध्यमांनी सेलिब्रिटी लोकांचा चालवलेला उदो उदो आणि यशस्वीतेचा संबंध बारीकपणाशी लावणे याचा कळस झाल्यामुळे १९७० मध्ये टीन ए ज मधल्या मुली आणि वीस ते तीस वर्षाच्या तरुणी यांच्यात स्वताला उपाशी ठेवण्यापासून ते कमी खाणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला.

@ अनोरेक्सीयाचे रुग्ण वजन कमी करण्यासाठी प्रचंड कमी प्रमाणात अन्न खातात, तर ब्युलीमियाचे रुग्ण वजन कमी करण्याच्याच हेतूने पण खूप जास्त खात असतात .दोन्ही विकारांमध्ये उलट्या आणि लॅक्झीटीव्हचा वापर रुग्ण भरपूर प्रमाणात करतात. जाड होण्याची भीती हे ब्ल्यूलिमिया होण्याचं प्रमुख मानसशास्त्रीय कारण असतं .मॉडेल्स बरोबर आपली तुलना करून आपण जाड आहोत असं बायका ठरवतात आणि त्यांना विकार जडू शकतो. तसाच टीनेजर्सना ते लठ्ठ असल्यानं सोबतचे विद्यार्थी चिडवतात आणि मग अति खाणं सुरू होऊ शकतो. ब्युलीमियाचे रुग्ण आपलं वजन फारसं कमी करत नाहीत. तसंच ते रुग्ण जास्त खुशालचेंडू, मनमोकळ्या स्वभावाचे आणि शारीरिक सुखाचा अनुभव जास्त प्रमाणात देणारे असतात असे रसेलचे मत आहे. बरेचदा नैराश्य आणि त्यातून बाहेर येण्यासाठी चमचमीत खाणं ,पुन्हा वजन वाढ, त्यामुळे अपराधी वाटणे आणि म्हणून परत नैराश्य असे हे दुष्टचक्र पण चालू असते. थोडक्यात वजन प्रमाणात ठेवण्याच्या इच्छेने अति खाणं आणि त्याबरोबर उलट्याचा अतिरेक, तसेच आठवड्यातून दोन अगर सलग तीन महिने हे वागणं ,जास्त कॅलरी देणारे अन्न खूप थोड्यावेळात खाणं या लक्षणांवरून याचे निदान केले जाते.

@ शेवटचा प्रकार” बिंज eating disorder”. B.E .D. किंवा कंपल्सिव ओव्हरिटिंग हा प्रकार वरील दोन्ही प्रकारांत पेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळतो. पू .ल. देशपांडे यांच्या बटाट्याच्या चाळीतील उपास या प्रकरणात डायटच्या नावाखाली खूप खाणाऱ्या माणसाचे जे वर्णन आहे ते वर्णन सहीसही याला लागू पडते. म्हणजे अति प्रमाणात खाणं, त्याबद्दल अपराधी वाटणं, मात्र ते अन्न शरीरातून काढून टाकायचा विचारही न करणं. अन्नाचे विलक्षण आकर्षण असतं .फॅट कॅलरीयुक्त आणि भरपूर स्टार्च असलेले पोषक द्रव्य कमी, असलेले चविष्ट अन्न खाऊन मनस्वी आनंदी होणाऱ्या व्यक्ती. कम्पल्सिवे ओव्हरिटिंग हेच याचे वैशिष्ट्य ! बेढब शरीराविषयी न्यूनगंड, वाईट वाटणे, एकटं वाटणे, दुःख किंवा कंटाळा येणे असे झाले की लोक खूप खायला लागतात पोट भरलं तरी अन्न संपेपर्यंत त्यांना बरं वाटत नाही.

पण आपल्या खाण्याबद्दल अपराधी भावना तर असते म्हणून हे उघडा बरेचदा चोरूनही खातात, बकाबक खाणं,नंतर खायला मिळेल की नाही याबद्दल शाश्वती नसल्याने खाण्यासाठी अन्नाचा साठा करून ठेवणं. अशावेळी त्यांना अपराधी आणि निराश तर वाटतं, वजन नियंत्रण करण्याची किंवा खाण्याच्या सवयी बदलण्याची आतून प्रचंड गरज वाटत राहते ,पुढच्या वेळी कमी खायचं असंही त्या व्यक्ती ठरवतात .असं दुष्टचक्र चालू राहतो. हा मनोविकार मनावर नियंत्रण नसल्याने होतो पण त्याला शारीरिक कारणही असू शकतात. भुकेचे चक्र नियंत्रित करणारा मेंदूचा भाग नीट कार्य करत नसेल किंवा सिरोटोनिन या रसायनांच्या पातळीत बदल होऊन ती कमी झाली तर तसेच त्याला अनुवंशिक कारणही असतात.

फ्रेंड्स ! बरेचदा असेही मानसिक आजार असू शकतात याची कल्पना सुद्धा येत नाही. याच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या सायकोथेरपी उपलब्ध आहेत .फक्त यासाठी असही काही होऊ शकतं याची माहिती मिळणं,जाणीव होऊन त्याचा स्वीकार करणं महत्वाचं असतं.

अलीकडे आणखीन एक इटिंग डिसॉर्डर ची यामध्ये भर पडली आहे. ती म्हणजे आरोग्यदायी आणि पोषणमूल्य योग्य असलेलं अन्न खाण्याच खूळ (ओबसेशन) हेही निर्माण झालं आहे. पण हे सगळे श्रीमंती विकार. उपोषणाच्या बाबतीतही भारताचा जगात पहिला नंबर आहे. एकीकडे मुबलक अन्न आणि दुसरीकडे कुपोषण. त्यातून समतोल आज फक्त आपल्याला साधायचा आहे. आपल्या महाराष्ट्रातले जेवण हे सर्वांग परिपूर्ण जेवण आहे. त्याचा अभिमान बाळगला पाहिजे.

ही बातमी पण वाचा : छेडछाड: टाइमपास की मनोविकृती

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER