उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार यांच्यातील समन्वयाचा धागा अहमद पटेल यांच्या रूपाने तुटला

Uddhav Thackeray - Ahmed Patel - Sharad Pawar

मुंबई :- महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अस्तित्वात  येण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना (Shiv Sena) – राष्ट्रवादीसोबत (NCP) कॉंग्रेस (Congress) येणार की नाही हा मोठा प्रश्न होता. मात्र अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या मध्यस्थीने आणि आमदारांच्या आग्रहाखातर अखेर कॉंग्रेसने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी होकार दिला होता. परंतु असे असले तरी महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजीच अनेक वेळा पाहायला मिळाली. आता तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचा महत्त्वाचा दुवाच हरपल्याची चर्चा होत आहे.

एवढेच नाही तर, सत्तेचं वाटप आणि सूत्र ठरवण्याची जबाबदारी अहमद पटेल यांच्यावर होती. त्यावेळी अहमद पटेल स्वतः मुंबईत आले होते. मुंबईत झालेल्या सर्व चर्चांमध्ये त्यांचा सहभाग होता. खाते वाटपामध्ये एकीकडे शरद पवार (Sharad Pawar)तर  दुसरीकडे काँग्रेसकडून अहमद पटेल होते. राष्ट्रवादीत बंड झाले. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर शपथ घेतल्यावर अहमद पटेल यांनी मुंबईतून सूत्रे  हलवली. त्यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना शरद पवार यांची भूमिका स्पष्ट सांगितली आणि त्यानंतर काँग्रेस शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची  सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी थेट संपर्क अहमद पटेल यांचाच होता. राज्यात सरकारमध्ये काहीही कुरबुरी झाल्या तर मातोश्री आणि सिल्वर ओकवरून थेट अहमद पटेल यांना संपर्क केला जात होता. शरद पवार आणि अहमद पटेल तर दिल्लीपासून जुने सहकारी असल्यामुळे शरद पवार हेदेखील एखादी गोष्ट करून घेण्यासाठी अहमद पटेल यांनाच फोन लावायचे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा access point अहमद पटेल होते. कोणतीही निवडणूक, जागा वाटप, उमेदवार निवड असो राज्यातील काँग्रेस नेत्यांनादेखील अहमद पटेल हाच एक आधार होता. अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडी सरकारचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार यांच्यातील समन्वयाचा धागा अहमद पटेल यांच्या रूपाने तुटला आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना ; पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER