टेनिस असो, क्रिकेट असो की गोल्फ; चॅम्पियन एकच- अ‍ॅशली बार्टी

Ashley Barty

महिला टेनिसमधील (Tennis) नंबर वन खेळाडू आॅस्ट्रेलियाची अ‍ॅश्ली बार्टी (Ashley Barty) भलेही कोरोनामुळे यंदाच्या युएस ओपन व फ्रेंच ओपनमध्ये खेळली किंवा खेळणार नसेल पण म्हणून तिचे ट्रॉफी जिंकणे काही थांबलेले नाही. टेनिसच्या आधी क्रिकेटमध्येही चमकलेल्या अ‍ॅश्लीने यशासाठी आपल्याला गोल्फ (Golf) कोर्सचेही काही वावडे नसल्याचे रविवारी दाखवून दिले. तिने रविवारी ब्रुकवॉटर गोल्फ क्लब येथील स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

२४ वर्षीय बार्टी हिचा टेनिसचा सराव अजून व्यवस्थित सुरु झालेला नाही. तिचे प्रशिक्षक क्वीन्सलँडचे असून आॅस्ट्रेलियन सरकारने कोरोनामुळे क्वीन्सलँडच्या सीमा अजून बंदच ठेवल्या आहेत. त्यामुळे बार्टी टेनिसशिवाय इतर खेळातही हात आजमावत आहे आणि या आठवडयाच्या अखेरीला ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या ब्रुकवॉटर गोल्फ स्पर्धेतही तिने यश मिळवले. याचठिकाणी तिचा बॉयफ्रेड गॅरी किस्सीक हा शिकावू व्यावसायीक गोल्फपटू आहे.

याच स्पर्धेत पुरुषांमध्ये विजेता ठरलेल्या लुइस डोबलार याने म्हटले आहे की, बार्टी गोल्फमध्येही यशस्वी ठरेल याबद्दल शंका नाही. तिच्याकडे यशस्वी गोल्फपटू होण्याचे सर्व गूण आहेत.म्हणून तिने मनावर घेतले तर इतर गोल्फपटूंना तिच्यापासून सावध रहावे लागेल. टेनिसमुळे तिचे चेंडू फटकावण्याचे कौशल्य चांगलेच आहे. हात आणि डोळ्यांचा योग्य समन्वय तिला त्यामुळे साधता येणे सहज आहे.

यशस्वी गोल्फपटू टायगर वूडसनेसुध्दा गेल्या वर्षी प्रेसीडेट कप स्पर्धेवेळी बार्टीचा खेळ बघून कौतुक केले होते. तिचे वडील रॉबर्ट हेसद्धा त्यांच्या काळात हौशी गोल्फपटू होते आणि त्यांनी आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER