मराठा असू द्या अथवा कोणीही, आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा; उदयनराजेंची मागणी

Udayan Raje

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा यावरून राजकारण तापताना दिसत आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर संभाजीराजे यांनी एल्गार केला असून, १६ जूनपासून कोल्हापूरातून राजर्षि शाहुंच्या समाधीपासून राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनास सुरूवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यातच आता उदयनराजे यांनीही मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा समाजाचा उद्रेक झाला, तर त्याला राज्यकर्ते जबाबदार असतील, असे म्हणत मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे.

साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यावेळी बोलत होते. यावेळी उदयनराजेंनी मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा असो अथवा कोणीही आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होतं हे चुकीचं आहे. जर लोकप्रतिनिधी प्रश्न निकाली काढणार नसतील तर लोकांचा उद्रेक दिसून येईलच. लोक दुसरा मार्ग निवडणारच. आज अनेकजण फास लावून घेत आहेत. मात्र आता लोक फास लावून घेणार नाहीत. तर राज्यकर्त्याना फास लावतील, आता ती वेळ लांब नाही, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button