निवडणुका व्यतिरिक्तही गुजराती समाजाशी सौहार्द ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला टोमणा

Devendra Fadnavis ShivSena

लोणावळा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरू केली आहे. शिवसेनेने नुकताच जोगेश्वरी येथे गुजराती बांधवांचा मेळावा घेतला. त्यावरून भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) अनेक वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली. फडणवीस म्हणालेत, निवडणुका व्यतिरिक्तही गुजराती समाजाशी सौहार्द कायम ठेवा.

लोणावळा येथे भाजपाच्या कार्यक्रमात ते म्हणालेत, निवडणुकांना समोर ठेवून का होईना शिवसेना गुजराती समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे ही आनंदाची बाब आहे. ते पण आपलेच नागरिक आहेत. मात्र, फक्त निवडणुकांच्या तोंडावरच गुजराती समाजाशी सौहार्द न ठेवता गुजराती समाजाशी नेहमी सौहार्दाचे संबंध ठेवले पाहिजेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे केल आहे. तसेच ऊर्दू भाषेत कॅलेंडर देखील काढली आहेत. शिवसेनेकडून ही सर्व प्रकारची नौटंकी सुरू आहे. लोकांना या गोष्टी समजतात. असा टोमणा फडणवीस यांनी मारला.

लोक कृतीतून आपले होतात

शिवसेनेने रविवारी जोगेश्वरी येथे आयोजित केलेल्या ‘मुंबई मा जलेबी ना फापडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही ‘टॅगलाइन’ वापरून आयोजित केलेल्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला. म्हणालेत, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला एकीकडे कडाडून विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला गुजराती समाजाला आपलेसे करायचा प्रयत्न करायचा. लोक कृतीतून आपले होतात, अशा कार्यक्रमांनी नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER