सावधान ! नवीन कोरोना विषाणूचं संक्रमण ब्रिटनपुरतं मर्यादित नाही

Coronavirus

मुंबई : ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू सापडत असल्याच्या बातमीनंतर जगभर खळबळ उडाली आहे. भारतासहीत जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणले आहेत. असं असलं तरी हा नवीन विषाणूचे संक्रमण किमान पाच देशात झाला, असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ब्रिटन मध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सावध पाऊल उचलत आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आढळला पाच देशांत –

ब्रिटनहून एक प्रवासी रोम येथे आला, त्यामुळं इटलीमध्येही हा नवीन कोरोना विषाणू सापडला आहे. फ्रान्सलाही नवीन विषाणू संबंधित धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्सनं आता ब्रिटनसोबतची प्रवासी वाहतूक थांबविली आहे. खरं तर म्युटेशनमुळं हा नवीन नवीन कोरोना विषाणू तयार झाला असावा, असं मानलं जात आहे.

या विषाणूची संसर्ग करण्याची क्षमता पूर्वीच्या विषाणूपेक्षा खूपच जास्त आहे. ब्रिटनमधील प्रकरणांच्या वाढीस ते जबाबदार मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते हा विषाणू 70 टक्क्यांपर्यंत अधिक संसर्गजन्य आहे. नोव्हेंबरमध्येच कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनची 9 प्रकरणं डेन्मार्कमध्ये आढळून आली होती, तर ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रकरण आढळून आलं.

तर नेदरलँड्स या देशात या नवीन कोरोना विषाणूचं एक प्रकरण समोर आलं आहे. बेल्जियमनं याबाबत अधिकृत पुष्टी दिलेली नाही. तर फ्रेंच आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे, या नवीन कोरोना विषाणूची चाचणी अद्याप केली नसली तरी हा विषाणू यापूर्वीच संपूर्ण फ्रान्समध्ये पसरलेला असू शकतो. उत्तर आयर्लंडच्या मंत्र्यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER