
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल, असे सरकार सांगत असले तरी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले जाते आहे त्यामुळे समाजात शंका निर्माण झाली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे सरळ नाव घेणाऱ्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे – थोडी लाज बाळगा, कुणाचे तरी लेकरू गेले आहे.
अजून कुठवर आणि किती बलात्काऱ्यांना पाठीशी घालणार? कुणाचे तरी लेकरू गेले आहे, थोडी लाज बाळगा; अशी टीका चित्रा वाघ यांनी सरकारवर केली. पूजा चव्हाण प्रकरणात उघड झालेल्या गोष्टींचा रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी ‘सुमोटो’ तक्रार दाखल करत संजय राठोडवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी, एव्हढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पाहता आहात, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
अजून कुठवर आणि किती बलात्कार्यांना पाठीशी घालणारं ????
कुणाचं तरी लेकरू गेलयं थोडी लाज असू द्या https://t.co/f6DkeFQkCO— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 13, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला