कोहलीच्या प्रश्नानंतर BCCI चा स्पष्टीकरण – रोहित आपल्या आजारी वडिलांना पाहण्यासाठी UAE हून मुंबईला परतला

Rohit Sharma

ऑस्ट्रेलिया दौर्‍याकडे पाहता ‘हिटमन’ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसची चाचणी घेतली जाईल. त्याच्या फिटनेसचे पुढील मूल्यांकन ११ डिसेंबर रोजी केले जाईल.

ऑस्ट्रेलियामधील आगामी कसोटी मालिका पाहता ‘हिटमन’ रोहित शर्माच्या फिटनेसची चाचणी घेतली जाईल. त्याच्या फिटनेसचे पुढील मूल्यांकन ११ डिसेंबर रोजी केले जाईल. त्यानंतरच त्याच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचा विचार केला जाईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) म्हटले आहे की रोहितचे बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट एकॅडमी (NCA) येथे रिहैबिलिटेशन सुरू आहे. त्याच्या फिटनेसचे पुढील मूल्यांकन केल्यावरच ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत त्याच्या सहभागाबाबत स्पष्टीकरण मिळेल.

मंडळाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रोहित शर्माला आपल्या आजारी वडिलांना पाहण्यासाठी IPL नंतर मुंबईत परत यावे लागले. त्याचे वडील बरे होत आहेत. यानंतर त्यानी रिहैबिलिटेशन सुरू करण्यासाठी NCA गाठले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी सांगितले होते कि रोहित शर्माच्या दुखापतीबाबत संभ्रमची स्तीथी आहे आणि त्याच्याकडे दुखापतीच्या स्थितीबद्दल पूर्ण माहिती नाही. त्याने असेही म्हटले आहे की रोहित उर्वरित संघासह ऑस्ट्रेलिया का आला नाही हे माहित नाही. विराटच्या प्रतिसादानंतरच BCCI ने रोहितशी संबंधित एक अपडेट जाहीर केला.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा IPL २०२० दरम्यान UAE मध्ये त्याच्या बाजूच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. तरीही तो बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतून बाहेर राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER