मंडळ करणार ज्युनियर क्रिकेटपटू व पंचांना अर्थसहाय्य

राष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रिकेटपटूंना (Domestic Cricketars) येत्या जून-जुलैमध्ये अर्थसाहाय्य कराण्यात येईल असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी जाहीर केले आहे.

ही घोषणा करताना ते म्हणाले की यंदा ज्युनियर क्रिकेटच्या स्पर्धा घेणे हा फार मोठा धोका होता आणि त्यामुळे सामने झाले नसेल तरी ज्युनियर गटातील खेळाडू, पंच व स्कोअरर यांना त्यांचे शुल्क देण्याची मंडळाची योजना आहे. त्यांना योग्य ती भरपाई देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 ने खेळांचे आणि सामान्य जीवनाचे फार मोठे नुकसान केले आहे. आॕक्टोबरपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल अशी आशा गांगुली यांनी व्यक्त केली आहे. महिला क्रिकेटला मंडळ प्रोत्साहन देत नसल्याचा समजही चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यंदा रणजी ट्रॉफीचे सामने झाले नाहीत, पण विजय हजारे ट्रॉफी व सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने झाले. कोरोना लाटेमुळे ज्युनियर गटाची आंतरराज्य स्पर्धा मात्र होऊ शकलेली नाही. 16 वर्षाआतील आणि 23 वर्षाआतील स्पर्धासुध्दा रद्द करण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button