चाहत्यांचा विरोधाला सामोरे जात IPL चे VIVO कनेक्शन तोडण्यासाठी सज्ज आहे BCCI

भारत आणि चीन यांच्यातल्या राजनैतिक तणावामुळे आयपीएलवरही याचा परिणाम झाला आहे. चिनी कंपनी विवोला यावर्षी आयपीएलपासून दूर जावे लागणार आहे

BCCI-IPL

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चिनी लिंकवरुन होणारे निषेध लक्षात घेता भारतीय क्रिकेट (Cricket) नियामक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. चिनी मोबाइल कंपनी विवो (VIVO) यापुढे आयपीएलची लीग प्रायोजक असणार नाही.

बोर्डने आयपीएलच्या १३ व्या आवृत्तीसाठी विवोपासून अंतर ठेवण्याचे ठरविले आहे. एका अहवालानुसार, आयपीएलच्या एका फ्रेंचाइजीने सोमवारी संध्याकाळी अन्य सात फ्रेंचाइजीना फोन करून सांगितले की व्हिवो आता टाइटल स्पॉन्सर नाही आहे. किमान १३ व्या हंगामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, फ्रेंचाइजी द्वारा अशाप्रकारे मंडळाच्या निर्णयाला सार्वजानिक केल्याबद्दल बीसीसीआय नाराज आहे.

या अहवालात म्हटले आहे की फ्रेंचाइजीच्या भूमिकेबद्दल मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. फ्रेंचाइजीने असे करण्यापूर्वी त्यांची परवानगी नको का घ्यायला पाहिजे होती? विवोशी दूरी केल्याच्या निर्णयानंतर आता बीसीसीआयने आयपीएलसाठी नवीन टाइटल स्पॉन्सर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येत्या २४ तासात या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे बोलले जात आहे.

अहवालात याचाही उल्लेख आहे कि प्रचंड विरोध पाहता विवो इंडियाही बोर्डाशी संबंध तोडू इच्छित आहेत. अहवालात एका भागधारकाचे म्हणणे आहे कि जर बोर्डाला किंमतीची ५०% रिप्लेसमेंट पण मिळाली तर ही एक उपलब्धी असेल. आपल्याला यापेक्षा अधिक मिळाल्यास ते अधिक चांगले होईल. आम्ही अपेक्षा करतो की प्रत्येक गोष्ट सौम्यपणे हाताळली जाईल. तूम्हाला सांगूया की आयपीएलची १३ ची आवृत्ती पुढच्या महिन्यात १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होईल. याचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. पहिले आयपीएल मार्चमध्ये भारतात होणार होता, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा युएईमध्ये घेण्याचे निश्चित झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलला चिनीशी जोडल्याबद्दल बीसीसीआयला बरीच टीका सहन करावी लागत होती. लोक सोशल मीडियावर # boycottIPL चा प्रचार करत होते. वास्तविक, बोर्ड विवोकडून बराच पैसा कमवत होती, त्यामुळे बोर्ड विवोला सोडण्यास टाळाटाळ करीत होता. विवो प्रतिवर्षी टाइटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होता. २०१८ मध्ये, विवोने २,१९९ कोटी रुपयांची बोली लावून ५ वर्षांसाठी टाइटल स्पॉन्सरशिप करार मिळविला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER