महावितरणाच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ बावनकुळेच : नितीन राऊत यांचा टोमणा

Chandrashekhar Bawankule - Nitin Raut

मुंबई : ‘माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज वीजबिलांना चितेवर अग्नी दिल्याचे दृश्य मी टीव्हीवर बघितले. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो. महावितरणाच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत, असा टोमणा ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मारला.

ते म्हणाले – ऊर्जा खात्यातील महावितरण त्यांच्याच कार्यकाळात मरणपंथाला लागली. त्यामुळे वीजबिलाच्या प्रतिकात्मक चितेला त्यांनी अग्नी देणे संयुक्तिक होते.

नितीन राऊत यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत त्यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली, बावनकुळे यांनी महावितरणला रुग्णशय्येवर नेले असले तरी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. महावितरणच्या (MSEDCL) आजारावर उपचार आम्हीच करू. नवसंजीवनी देऊ. महावितरण पुन्हा धडधाकट करणे हेच आमचे प्राधान्य राहणार आहे’.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER