शेतकरी आंदोलन आणि निर्यातीमुळे बासमती महागला

Basmati Price Hike

सांगली : दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणि निर्याती यामुळे बासमती तांदळाच्या किंमतीत क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आंदोलनामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली तसेच परदेशात तांदुळ निर्यात झाल्याचा हा परिणाम असल्याचे धान्य व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

पंजाब आणि हरयाणाच्या सीमेवर गेली महिनाभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणातून येणारा बासमती तांदुळ राज्यात आलाच नाही. यंदाच्या हंगामात तांदळाचे उत्पन्न चांगले होवूनही आंदोलनामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली. उत्तरेतील राज्यातून येणार तांदूळ आला नाही. तुकडा आणि अन्य बासमती तांदळाच्या किंमतीमध्ये फारसा फरक पडला नाही. मात्र, अखंड बासमत तांदुळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. इतर प्रकारच्या तांदुळाची आवक कायम असून या किंमतीत फरक पडलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER