दत्तक घेतलेल्या वासराचे जाऊळ काढून केले बारसे!

Cow

बरेली : उत्तर प्रदेशातील विजयपाल आणि राजेश्वरी देवी या दाम्पत्याने त्यांच्याकडील गाईच्या अनाथ वासराला दत्तक घेतले आहे. या दाम्पत्याच्या लग्नाला १५ वर्ष झाले असून त्यांना मूल नाही. वासराचा जन्म झाल्यानंतर गाय मेली. वासरू एकटे राहिले होते.

आपण गाईला आई मानतो तर तिच्या वासराला मुलगा का मानू नये, असे विजयपाल यांनी म्हटले आहे. विजयपाल आणि राजेश्वरी देवी याना मूल नाही, त्यांनी या वासरालाच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. वासराचे नाव ललतूबाबा ठेवले. ते म्हणतात जन्मापासूनच हे वासरु आमच्याशी जुळले आहे. ललतूचे आमच्यावरचे खरे आणि निरपेक्ष प्रेम आहे.

बुधवारी वासराला दत्तक घेतल्यानंतर त्याचे जाऊळ काढण्याचा विधि केला. गोमती नदीच्या काठी जाऊळ काढले. ब्राह्मणाने माता-पिता आणि दत्तकाला आशीर्वाद दिला. कर्यक्रमासाठी ५०० नातेवाईक-परिचितांना निमंत्रण देण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले रत्नेश मिश्रा म्हणाले – या जावळाचे निमंत्रण पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. खूप लोक हजर होते. विजयपाल, राजेश्वरी देवी आणि ललतूबाबाच्या कुटुंबाबाबत आम्ही आंनदी आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER