नीरेचे पाणी देण्याच्या निर्णयाचे बारामतीत साखर वाटून स्वागत

बारामती : महाविकास आघाडीच्या कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत नीरेच्या डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला देण्याच्या निर्णयाचे बारामतीत पेढे आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. याचा फायदा बारामती आणि इंदापूर तालुक्याला फायदा होणार आहे.

पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या तुलनेवरून सोमय्या नाराज

या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर कुरघोडी केली आहे. आमच्यावर अन्याय झाला होता. मात्र अजितदादांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यात आल्याची प्रतिक्रिया येथील लोकांनी व्यक्त केली. हे पाणी स्टोरेज राहत होते. नीरा डावा आणि उजवा हे इंग्रजांच्या काळापासून आहे. या कॅनलचे पाणी राजकीय द्वेषापोटी कमी केले असते तर या कॅनलवर असणारी साखर कारखानदारी संपली असती.

तुम्ही येथील साखर कारखानदारीचा, उसाचा विचार करता मात्र लोकांना पिण्याचे पाणीच मिळत नाही त्याचे काय? असा सवाल केला असता नागरिक म्हणाले, हे पाणी आपल्या कोट्यातून मिळते आणि त्याचा पिण्याचासुद्धा उपयोग होते. ज्या भागात पिण्याच्या पाण्याच्या अडचणी होत्या त्या भागात कॅनालच्या आजूबाजूला अजितदादांनी पाण्याची तळी उभारल्याचे नागरिक म्हणाले.