बारामती पॅटर्न आता परळीतही राबवणार ; धनंजय मुंडेंचा निर्धार

Dhananjay Munde

मुंबई : परळी (Parli) शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी येथे बारामती पॅटर्न (Baramati Pattern) राबवून सर्वांसाठी घरे योजनेतून 6 हजार घरकुले बांधण्याचा माझा संकल्प असून, निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक वचनावर मी ठाम आहे व त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी लोकांना दिला आहे. परळी नगर परिषदेच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचे धनादेश वाटप पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते .

परळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न शासनाच्या विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार असून तसेच परळी शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कार्पोरेशन मार्फत परळी शहरात साडेपाच हजार घरकुले बांधून देण्याचा प्रकल्प येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहे. तसेच नगर परिषद परळी वैजनाथ अंतर्गत सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकूल बांधण्याकरिता दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर असून लाभार्थ्यांची एकूण संख्या 1357 झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांस दोन लाख पन्नास हजार अनुदान मंजूर असून लाभार्थ्यांना शासन निर्देशाप्रमाणे काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता 40 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे असे सांगून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी पथविक्रेत्यासांठी सुक्ष्म पतपुरवठा योजने अंतर्गत 668 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 640 अर्जास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 33 लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले असल्याचे मुंडे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER