राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर गोळीबार ; बारामतीत खळबळ

 इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना

Maharashtra Today

मुंबई :- बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्यकर्ते आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे (Rohini Taware) यांचे पती रविराज तावरे (Raviraj Taware) उर्फ चिकू पाटील यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. ३१) रोजी सायंकाळी माळेगावमध्ये घडली. घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना आहे.

माहितीनुसार, रविराज तावरे हे पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत माळेगावातील संभाजीनगर भागातून स्वत:च्या मोटारीतून गेले होते. तेथे वडापाव घेत त्यांनी वडापाव विक्रेत्याला पैसे दिले. गाडीकडे येत असताना दुचाकीहून आलेल्या दोघानी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली. जखमी अवस्थेत त्यांना लागलीच येथील बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तावरे यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button