बारामतीत अजित पवारांचाच डंका; पडळकरांसह इतरांचे डिपॉझिट जप्त

Ajit Pawar

पुणे : गेली अनेक दशकं पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचाच डंका कायम असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान मोडीत काढलं आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिटदेखील जप्त झालं आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

विशेष म्हणजे भाजपने अजित पवारांना आपल्या होम ग्राउंडवर घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अजित पवारांचा पराभव करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही हे आव्हान स्वीकारत चंद्रकांत पाटलांसह सर्वांचेच बारामतीतून लढण्यासाठी स्वागत केले होते. तसेच बारामतीतून एक लाख मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. तो या निकालातून खरा ठरला आहे.