शिवसेना नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल! निलेश राणेंचा टोमणा

Nilesh Rane-sanjay-raut

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी काँग्रेसचे (Comgress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केल्याबद्दल शिवसेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी जाहीर व्यक्त केली. परदेशातील राजकीय नेते भारतातील राजकीय नेत्यांबाबात अशा पद्धतीचे मत जाहीर करू शकत नाही, असे संजय राऊत शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणालेत.

यावरून माजी खासदार व भाजपाचे (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊत व शिवसेनेला टोमणा मारला – “शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल!” याबाबत केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले – शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल. आता ओबामांचं  कसं  होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचं आता काही खरं नाही!

न्यूयॉर्क टाइम्सने ओबामांच्या ‘ए प्रॉमिसिड लॅण्ड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला. यात बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा हे राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहे. ज्या विद्यार्थ्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचं  आहे. परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER