शिवसेनेचे खंदे समर्थक बापू गुरव यांचा भाजपमध्ये प्रवेश; शिवसेनेला धक्का

Bappu Gurav

देवरुख /प्रतिनिधी: संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे माजी सभापती मधुकर गुरव यांचे बंधू आणि शिवसेनेचे खंदे समर्थक बापू गुरव यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई कदम यांच्या नेतृत्वाखाली व संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम व ओझरे गट शक्तीकेंद्र प्रमुख बाबू गुरव यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या तालुका कार्यालयात श्री. बापू गुरव यांचा पक्षप्रवेश झाला.

यावेळी देवरुख शहर अध्यक्ष सुधीर यशवंतराव, देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजेंद्र गवंडी, भाजपा जेष्ठ नेते बबन किर्वे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते विवेक भागवत, भाजपा युवा नेते भगवत सिंह चुंडावत, पांड्या आंबेकर उपस्थित होते. बापू गुरव यांनी भाजपामध्ये केलेल्या पक्षप्रवेशाने मारळ गावातील सेनेच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. यावेळी संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी बापू गुरव यांच्यावर मारळ गावाच्या बूथ कमिटीची जबाबदारी सोपविली.

चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपात प्रवेश