बॉम्ब बनवण्याचं कौशल्य शिकलेल्या बापटांनी, अहिंसेच्या जोरावर अनेक आंदोलनं यशस्वी केली

Pandurang Mahadev Bapat - Maharashtra Today

१९२१ साली निर्णायक ‘मुळशी सत्याग्रहा’चं नेतृत्व पांडूरंग महादेव बापट (Pandurang Mahadev Bapat) यांनी केलं. या आंदोलनाचा प्रभाव इतका पडला की त्यांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा ‘सेनापती’ अशी बिरुदावली मिळाली. त्यांनी शेवटपर्यंत ही बिरूदावली मिरवली. शेतकऱ्यांना बळजबरीने विस्थापन करायला लावणाऱ्या इंग्रज सरकाराविरुद्ध त्यांनी फक्त दंड थोपटले नाही तर चितपट ही केलं. मुळीशी सत्याग्रहाला अनेक इतिहासकार शेतकऱ्यांचा पहिला यशस्वी बंड मानतात.

सेनापती बापटांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० साली अहमदनगरच्या पारनेरमध्ये झाला. एका मध्यमवर्गीय चित्पावन ब्राम्हणाच्या घरात शिस्तीत त्यांच बालपण गेलं.स पुण्याच्या डेक्कन महाविद्यायलात त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. त्यांच्या मनात राष्ट्रवादाची प्रखर भावना निर्माण झाली. क्रांतीकारी चाफेकर बंधूंशी त्यांचा संबंध आला. दामोदर बळवंत भिडे आणि ब्रिटीश प्राध्यापक फ्रांसिस विलीयम्स यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले.

याच काळात पुण्यात प्लेगचा भयानक प्रसार होत होता. ब्रिटीश अधिकारी कशाप्रकारे भारतीयांवर महामारीच्या काळात अत्याचार करत आहेत. ब्रिटीश अधिकारी रँडल्सची हत्या आणि शिवजयंती, गणेशोत्सवाच्या सणांमुळं बापटांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात उडी घेणं भाग पडलं. १९०४ ला महाविद्यालयातून निघाल्यानंतर बापट इंग्लंडच्या एडिनबर्गच्या हेरिऑट वॉट कॉलेजमध्ये शिकायला गेले.

दादाभाई नौरोजींनी लिहलेल्या ‘पोव्हटी इन इंडीया’ या ग्रंथामुळं बापटांना इंग्रज करत असलेल्या भारतीयांच्या शोषणाबद्दल त्यांना कळालं. याच काळात त्यांचा संपर्क इंग्लंडमधील समाजवाद्यांशी आला. रशियात बोल्शेविक क्रांती करणाऱ्या क्रांतीकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेतली होती. भारतात इंग्रजांविरोधी केलेली उत्तेजनात्मक भाषण आणि लंडनच्या इंडीया हाऊसमध्ये ब्रिटीशांविरुद्ध घेतलेली भूमिका त्यांना महागाड पडली. त्यांची शिष्यवृत्ती हिरावून घेण्यात आली.

भारतात परतल्यानंतर त्यांची भेट वि. दा. सावरकरांशी झाली. त्यांच्या सल्ल्यावर ते रशियन सहकाऱ्यांबरोबर पॅरिसला गेले. तिथं जाऊन त्यांनी बॉम्ब बनवण्याची कला शिकली. भारता परतले तर बॉम्ब बनवणार तज्ञ म्हणून. त्यांनी सोबत आणलेल्या पिस्तूली देशभरातील क्रांतीकाऱ्यांना वाटण्यात आल्या होत्या. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठावाची त्यांची योजना होती पण ती शक्य होऊ शकली नाही. व्यक्तीगत स्तरावर त्यांनी अनेक क्रांतीकारी घटना घडवून आणल्या.

बंगालच्या चॉंदनगरमध्ये मेअरच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अनेक क्रांतीकाऱ्यांना अटक करण्याचं सत्र सुरु झालं. बापट दोन वर्षांसाठी भूमिगत झाले होते. १९१२ ला ते पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले नसल्यामुळं त्यांची सुटका झाली.

१९२० पर्यंत गांधींच्या ‘स्वराज्य’ धोरणाचा त्यांनी अवलंब केला होता. यानंतर त्यांनी जगातल्या पहिल्या धरणविरोधी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि ‘मुळशी सत्याग्रह’ यशर्वी करुन दाखवला. माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहांसारख्या प्रसिद्ध इतिहासकारांनी ‘द इकॉलॉजी ऑफ इक्विटी- द युजर अँड एब्यूस ऑफ नेचर इन कंटेम्परोरी इंडीया’ या ग्रंथात या घटनेचा उल्लेख केलाय ते लिहतात, “सुरुवातीला टाटा कंपनी कोणत्याच कायद्याची औपचारिकता न दाखवता शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याच्या विचारात होती. कंपनीनं जमिनी बळकवून तिथं खोद कामाला सुरुवात केली. मुळशी पुण्यापासून जवळ होतं. पुणे त्यावेळी स्वतंत्रा आंदोलनाचं केंद्र होतं. जेव्हा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर ब्रिटीशांनी बंदूका उचलल्या तेव्हा सर्वात तीव्र विरोध पुण्यातूनच झाल.”

धरणाचा विरोध करण्यासाठी कॉंग्रसमधली धडाडीचे युवा कार्यकर्ते सेनापती बापट मैदानात उतरले. धरणाच्या निर्मितीली एका वर्षांसाठी रोखण्यात ते यशस्वी ठरेल. तीनवर्ष विरोध चालला. विरोध पुर्णपणे अहिंसक होता. नंतर बापटांना अटक झाली. शेतकऱ्यांना मोबदला देऊनच बांधाच काम तर पुर्ण झालं पण देशाला ‘शुद्ध सत्याग्रहा’चा सिद्धांत मिळाला.

मुळशी सत्याग्रतहासाठी त्यांनी आयुष्यातली ७ वर्षे तुरुंगात घालवावी लागली. १९३१ साली त्यांची सुटका झाली. यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी आयोजित केलेल्या आमसभेत ते सामील झाले.यामुळं बापट यांना तिसऱ्यांदा तुरुंगवास झाला.

१५ ऑगस्ट १९४७ साली पुण्यात पहिल्यांदा तिरंगा फडकवण्याचं त्यांना भाग्य मिळालं. वयाच्या ८७व्या वर्षी सेनापती बापटांनी २८ नोव्हेंबर १९६७ साली जगाचा निरोप घेतला. सशस्त्रक्रांतीची स्वप्न पाहणाऱ्या युवकानं सत्याग्रहाचा रस्ता धरला होता. हा गांधींच्याच विचारांचा विजय म्हणावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button