वड : पौराणिक, धार्मिक आणि औषधी दृष्टीने महावृक्ष !

banyan tree-Ayurveda

चारही बाजूंना फांद्या पसरलेला मोठा वृक्ष. वटवृक्षाला (banyan tree) अक्षय्य वृक्षपण म्हणतात. वडाच्या पारंब्या जमिनीत घुसून या वृक्षाचा विस्तार करीतच राहतात. असा हा विस्तृत वृक्ष धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण. वटपौर्णिमा हा विशेष सण या वृक्षाला पुजण्याचा. सौभाग्य अखंडित राहो, पतीचे आयुष्य, आरोग्य या वटवृक्षाप्रमाणे अक्षय्य म्हणजेच क्षय न होवो याकरिता वडाची विशेष पूजा केली जाते. वडाच्या पारंब्या होम हवनात समिधा म्हणून वापरल्या जातात.

  • वडाचा उपयोग आयुर्वेदात अनेक औषधी कल्पांमध्ये होतो.
  • वडाला आयुर्वेदात वट, न्यग्रोध, बहुपाद अशी पर्यायी नावे आली आहेत. वडाच्या पारंब्या, पत्र, फळ, क्षीर तसेच साल विविध औषधी कल्पांमध्ये वापरण्यात येते.
  • वडाचे दूध व्रण, जखम, सूज यावर लेप स्वरूपात लावतात. कर्णस्राव , दन्तशूल यावर क्षीर वापरण्यात येते.
  • त्वचारोग तसेच कुष्ठ व्याधीवर वडाच्या पारंब्याचा लेप लावल्यास पूयाचे शोषण करून त्वचारोग लवकर बरे होतात.
  • मुखपाक तोंड येणे यावर वडसालीच्या काढ्याने गुळण्या उपयोगी आहे.
  • वडाच्या पारंब्या, पेशी अथवा अवयवांना आलेला ढिलेपणा कमी करतात. स्तन शिथिल झाले असतील तर वडाच्या पारंब्याचा लेप लावल्यास शिथिलता दूर होते.
  • काही स्त्रियांना मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्राव होतो किंवा काही जणींना पांढरे पाणी, योनी दुर्गंध असे त्रास होतात. अशा विकारांवर वडाच्या सालीचा काढा करून योनीभाग स्वच्छ धुवावा. त्यामुळे दुर्गंध, स्राव कमी होतात. आयुर्वेदात वडाच्या सालीचा या तक्रारींवरील औषधी निर्माणात वापर करतात.
  • शुक्रधातुदोषावर वडाच्या सालीचा उपयोग केला जातो.
  • वडाच्या पारंब्या केसांच्या तक्रारींवर उत्तम कार्य करतात. वटजटादी तेल वडाच्या पारंब्यांपासून तयार केले जाते. वडाच्या पारंब्या जशा लांब लांब असतात तसे केस वटाच्या पारंब्यानी सिद्ध केलेले तेल कार्य करते.
  • आयुर्वेदात अनेक औषधी कल्प वडाच्या विविध भागांचा उपयोग करून तयार करतात. उदा. वटजटादी तेल, न्यग्रोधादी चूर्ण, पंच वल्कल क्वाथ – चूर्ण इत्यादी.

या औषधांचा उपयोग सर्दी, अतिसार, प्रजनन संस्थानाचे अनेक वेगवेगळे व्याधी, प्रमेह अशा व्याधीमध्ये करण्यात येतो. असा हा वटवृक्ष सर्वांत जास्त प्रमाणात प्राणवायू देणारा, सावली देणारा, धार्मिक, पौराणिक महत्त्व असलेला वृक्ष. त्याच प्रमाणात शरीरातील विविध व्याधींना हरणारा हा वटवृक्ष !

ayurveda

 

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER