सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी; महापालिकेचे आदेश

Pune MahanagarPalika - Swab Test - Maharastra Today
Pune MahanagarPalika - Swab Test - Maharastra Today

पुणे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावले आहे. तसेच नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची RT-PCR चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.

गृहनिर्माण सोसायटीने याबाबत सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी करण्यात यावी. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात यावे, असेही यात नमूद केले आहे.

दरम्यान, गृहनिर्माण सोसायटीमधील जिम, स्वीमिंग पूल आणि क्लब हाऊस वापरण्यास प्रतिबंध केले आहेत. राज्यात कालपासून १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत सोसायटीतील नागरिकांना उद्यान आणि आवारातही फिरण्यावर प्रतिबंध राहणार आहे. तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोना स्थिती

शहरात काल दिवसभरात ४ हजार २०६ नवे रुग्ण आढळले. तर ४ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. काल ४६ जणांचा मृत्यूही झाला. सध्या ५३ हजार ३२६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील १ हजार १५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कालच्या आकडेवारीसह एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ४४ हजार २९ वर जाऊन पोहोचली आहे. यातील २ लाख ८४ हजार ८०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ५ हजार ९०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना स्थिती काय?

काल दिवसभरात ५८ हजार ९५२ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर दिवसभरात २७८ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ३९ हजार ६२४ जण कोरोनामुक्त झालेत. कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३५ लाख ७८ हजार १६० वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील २९ लाख ५ हजार ७२१ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ५८ हजार ८०५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६ लाख १२ हजार ७० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button