आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबादेत बॅनरवॉर, भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ उल्लेख

Aaditya Thackeray - Sambhaji Nagar

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं असताना आता भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनरबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेच्या (Shiv Sena) सुपर संभाजीनगर (Super Sambhajinagar) या कॅम्पेनविरोधात भाजपने शहरात नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात या सगळ्या घडामोडी घडत आहेत.

औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणावरुन सध्या राजकारण ढवळून निघाले आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) औरंगाबादच्या नामकरणाला जाहीर विरोध केला आहे. काँग्रेसच्या या विरोधामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली असताना भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद या बोर्डासमोर नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. भाजपच्या याच बॅनरमुळे शहरातील राजकारण आता पुन्हा तापणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य यांचा दौरा लक्षात घेऊन येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. त्यांनी शहरात जागोजागी सुपर संभाजीनगरचे बॅनर लावले आहेत. मात्र शिवसेनेच्या याच कॅम्पेनिंग विरोधात भाजपने दंड थोपटले असून भाजपने एकीकडे नमस्ते संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी केली आहे. भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपने नमस्ते संभाजीनगर लिहून मोठे बॅनर लावले आहे.

आदित्य ठाकरेंचा हा दौरा लक्षात घेऊन शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, शहरातील टीव्ही सेंटरसमोरील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचे आदित्य ठाकरे यांचे बॅनर काही संभाजी महाराज प्रेमींनी हटवले आहे. पुतळ्याला अडथळा होत असल्यामुळे आदित्य यांचे बॅनर हटवल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER