शेतकऱ्यांना खरिपासाठी बँका त्वरित कर्ज उपलब्ध करणार; छगन भुजबळांची माहिती

Chhagan Bhujbal - Maharashtra Today

नाशिक : कोरोना माहामारी लक्षात घेता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, याकरीता शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कर्जाचे हप्ते आणि नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँका त्वरित कर्ज उपलब्ध करून देतील, असे ते म्हणाले.

आज पीक कर्जाबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा. सहकारी संस्थांमार्फत घेतलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या जमिनींचा लिलाव करणे अनुकूल नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली, त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकाकडून आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत.”

२०२१-२२ या वर्षातील २ हजार ७०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी दोन महिन्यांत ४४५ कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button